Follow Us

सरवदे हत्येप्रकरणी अमित ठाकरे संतप्त, फडणवीसांना थेट इशारा

 

सोलापूरमधील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणाऱ्या बाळासाहेब सरवदे हत्येप्रकरणावर मनसे नेते अमित ठाकरे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. सरवदे कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी सोलापुरात आलेल्या अमित ठाकरे यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट आव्हान दिले आहे. या दौऱ्यात त्यांनी भावनिक शब्दांत न्यायाची मागणी करत निवडणुकीसाठी होणाऱ्या हिंसाचारावर संताप व्यक्त केला.

सोलापूर : सरवदे हत्येप्रकरणी अमित ठाकरे संतप्त, फडणवीसांना थेट इशारा

सोलापूर | 4 जानेवारी

मनविसेचे शहराध्यक्ष बाळासाहेब सरवदे यांच्या हत्येप्रकरणी कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी मनसे नेते अमित ठाकरे रविवारी सोलापुरात दाखल झाले. या दौऱ्यात त्यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली.

सरवदे कुटुंबीयांची भेट, भावनिक वातावरण

सोलापुरात पोहोचताच अमित ठाकरे थेट बाळासाहेब सरवदे यांच्या निवासस्थानी गेले. तेथे त्यांनी शोकाकुल कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले. यावेळी सरवदे कुटुंबीयांनी आपली व्यथा मांडली. घरातील वातावरण अत्यंत भावनिक होते.

संपूर्ण परिस्थिती मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार

यानंतर पत्रकारांशी बोलताना अमित ठाकरे म्हणाले की,
सरवदे यांच्या हत्येप्रकरणी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची थेट भेट घेणार आहोत. फक्त दहा मिनिटांची वेळ मागणार असून, सोलापुरातील पोलिस आयुक्त किंवा इतर कोणालाही भेटणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“सोलापुरातील नेमकी परिस्थिती मुख्यमंत्र्यांसमोर मांडायची आहे,” असे त्यांनी सांगितले.

सांत्वन भेटीदरम्यान नेमकी काय चर्चा झाली हे सांगण्यास त्यांनी नकार दिला.


निवडणुकीसाठी लोकांचे खून?

सरवदे यांच्या आई, पत्नी आणि दोन मुली आज अस्थिविसर्जन करून आल्या आहेत, हे सांगत ठाकरे यांनी संताप व्यक्त केला.
“हे सगळं कशासाठी? निवडणुकीसाठी? असे राज्य भाजपला अपेक्षित होते का?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.

अर्ज मागे घेतो, पण खून करू नका

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोलापुरात येऊन सरवदे कुटुंबीयांची भेट घ्यावी, अशी मागणी अमित ठाकरे यांनी केली.
“लोकांचे खून पाडून निवडणुका जिंकणार असाल, तर निवडणुकाच नकोत. आम्ही सर्व उमेदवारी अर्ज मागे घेतो, तुम्हीच जिंका. पण बिनविरोधसाठी लोकांचे खून करू नका,” अशी कळकळीची विनंती त्यांनी केली.

राजकारण नव्हे, माणुसकीचा प्रश्न

“मी कधीही मृत्यूवर राजकारण करत नाही आणि आजही तसे करण्यासाठी आलो नाही,” असे सांगत ठाकरे म्हणाले की,
सोलापूरच्या घटनेचा गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे. समाजातील माणूस जागा झाला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

सरवदे यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलणार

सांत्वन भेटीदरम्यान नेमकी काय चर्चा झाली हे सांगण्यास त्यांनी नकार दिला. मात्र, बाळासाहेब सरवदे यांच्या मुलांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च आपण उचलणार असल्याचे अमित ठाकरे यांनी स्पष्ट केले.

ही बातमीही वाचा - मीडियावरील छुप्या प्रचारावर कडक नजर 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या