Follow Us

भाजपच्या प्रदेशाध्यक्षांचे डाेके ठिकाणावर आहे का? Is the BJP state president's position correct?

 
भाजपच्या प्रदेशाध्यक्षांचे डाेके ठिकाणावर आहे का?

पण रविंद्र चव्हाण यांच्या बाेलण्याला अलिकडच्या काळात ताळतंत्रच राहिले नाही. अगदी ग्रामीण भाषेत सांगायचे तर त्यांना बडबडी सुटली आहे. वाट्टेल ते बाेलण्यात सध्या त्यांचा क्रमांक पहिला आहे. आपण एका राष्ट्रीय पक्षाचे म्हणजे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहाेत, याचेही त्यांना भान राहिलेले नाही.

भाजपच्या प्रदेशाध्यक्षांचे डाेके ठिकाणावर आहे का?

लाेकांसाठी काम केलेल्यांच्या आठवणी, लाेकांच्या मनावर काेरलेल्या असतात, लिहिलेले पुसता येते, काेरलेले पुसता येत नाही. ही पाेस्ट आहे, विलासराव देशमुख यांचे पूत्र अभिनेते रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) यांची. ही पाेस्ट नेमकी काय आहे, का लिहिली आहे? तर याला कारणही तसेच आहे. दिनांक 04 जानेवारीला लातूरमध्ये महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आले हाेते. प्रचारसभेत बाेलताना चव्हाण म्हणाले, आता लाेकांचा आम्हाला इतका प्रतिसाद मिळताेय, ताे पाहून आता वाटते की नक्की लातूरमधून विलासराव देशमुख यांच्या आठवणी पुसल्या जातील. असे ते बाेलून गेले पण जमलेल्या लाेकांनाही त्यांनी विलासराव देशमुख यांच्याबद्दल केलेले हे वक्तव्य रूचले नाही.Is the BJP state president's position correct? 

कार्यक्रम संपल्यानंतर काही पत्रकारांनी या विषयी त्यांच्याशी बाेलण्याचा प्रयत्न केला, पण पत्रकारांनाही टाळून त्यांनी त्याठिकाणावरून काढता पाय घेतला...खरे तर लातूरच्या सभेत विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांच्यासंदर्भात असे विधान करण्याची काहीच गरज नव्हती. एकवेळ त्यांच्या राजकारणावर, त्यांच्या धाेरणावर टीका केली असती तर समजू शकले असते. मुळात विलासरावांना आपल्यातून जाऊन आज तेरा वर्षे लाटली आहेत. अशावेळी त्यांच्यावर काेणत्याही प्रकारची टीका-टिपण्णी करण्याचे काहीच कारण नव्हते.

त्यांना बडबडी सुटली आहे

 पण रविंद्र चव्हाण यांच्या बाेलण्याला अलिकडच्या काळात ताळतंत्रच राहिले नाही. अगदी ग्रामीण भाषेत सांगायचे तर त्यांना बडबडी सुटली आहे. वाट्टेल ते बाेलण्यात सध्या त्यांचा क्रमांक पहिला आहे. आपण एका राष्ट्रीय पक्षाचे म्हणजे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहाेत, याचेही त्यांना भान राहिलेले नाही. प्रदेशाध्यक्ष हा त्या पक्षाचा चेहरा असताे. मुख्यमंत्र्यांपेक्षाही या पदाची गरीमा माेठी आहे. पण आपण काेणत्या खुर्चीवर बसलाेय, याचे भान राहिले नाही की मग असे हाेते. विलासराव देशमुख यांचे महाराष्ट्राच्या विकासात असलेले याेगदान कदाचित त्यांना माहिती नसावे, नाहीतर असले फालतू आणि बालिश वक्तव्य त्यांनी नक्कीच केले नसते. लातूरच्या ( Latur)मनामनात आणि घराघरात विलासराव देशमुख हे नाव काेरलेले आहे. विलासराव देशमुख यांच्या राजकीय विराेधकांकडूनही असली बेताल टीका-टीपण्णी हाेणे केवळ आणि केवळ अशक्य आहे. विलासराव देशमुख आणि लातूर हे घट्ट नाते आहे. Is the BJP state president's position correct? 

तळागाळातल्या लाेकांशी त्यांची थेट नाळ

लातूरला जिल्ह्याचा दर्जा मिळवून देण्यापासून ते या शहराचा चेहरा-माेहरा बदलण्याचे काम विलासराव देशमुख यांनीच केले. तळागाळातल्या लाेकांशी त्यांची थेट नाळ जाेडल्या गेलेली हाेती. ते मुख्यमंत्री हाेते, तरीही लातूरचा अगदी सामान्यातला सामान्य माणूस त्यांना थेट ाेन करत असे आणि विलासराव देशमुख यांचे वैशिष्टय असे हाेते की ते कितीही कामात असले तरी त्याच्याशी अगदी त्याचे समाधान हाेईपर्यंत बाेलत असायचे. यासाठी एक किस्सा सांगितला तरी त्यावरून समजेल की लातूर आणि त्यांचे नाते कसे हाेते. विलासराव देशमुख मुख्यमंत्री हाेते त्यावेळचा हा किस्सा आहे. लातूर शहरात वाहतूक पाेलीसांनी एका जीपवाल्याला अडविले. त्याच्याकडे काही कागदपत्रे नव्हती, म्हणून पाेलीस दंडाची पावती फाडू लागले.Is the BJP state president's position correct?  

अरे, ताे माझा कार्यकर्ता आहे बाबा

त्याने तेवढ्या वेळात माेबाईवरून एक नंबर िफरविला आणि पलिकडच्या व्यक्तीशी काहीतरी बाेलला आणि थेट त्यांने माेबाईल पाेलीसाच्या हातात दिला आणि म्हणाला, बाेला इकडे, पाेलीस कर्मचारी म्हणाला काेण आहे?, ताे जीपवाला म्हणाला, साहेब आहेत, त्यावर पाेलीसाने विचारले, काेण साहेब? ताे जीपवाला म्हणाला, विलासराव देशमुख साहेब. पाेलीस हसायला लागला, काय तरी काय फेकतो  रे, असे म्हणत त्याने माेबाईल घेतला आणि हॅलाे म्हणाला, पलिकडून मुख्यमंत्री विलासराव देशमुखच  बाेलत हाेते. पाेलीसाने आवाज ओळखला आणि त्याला काय बाेलावे, हेच कळेना. पण पलिकडून विलासरावच म्हणाले, अरे, ताे माझा कार्यकर्ता आहे बाबा, साेड त्याला, त्याचा काही दंड वगैरे असेल तर सांग, मी काेणालातरी तुझ्याकडे पाठविताे, त्याच्याकडे दंडाची पावती दे....

सामान्यांचे त्यांच्याशी असलेले थेट नाते

हे हाेते विलासराव देशमुख आणि हे हाेते सामान्यांचे त्यांच्याशी असलेले थेट नाते. आता हे नाते पुसून टाकण्याची भाषा करणाèया चव्हाणांना हे नाते कसे समजणार? विलासराव देशमुखांनी अगदी खुल्या दिलाने राजकारण केले. राजकारण हे विकासासाठी करायचे असते, समाजाच्या उन्नतीसाठी करायचे असते, ही त्यांची धारणा हाेती. म्हणूनच त्यांनी आपल्या राजकीय विराेधकांवरही कधी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली नाही. भाजपमधील गाेपीनाथराव मुंडे (Gopinath Munde) आणि त्यांची मैत्री आजही लाेकांना आठवते. साहित्याची आवड असणारे, संगीताची आवड जपणारे, आणि तितक्याच भक्तीभावाने विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक हाेणारे विलासराव देशमुख म्हणजे लातूरचा श्वास आहेत. आणि चव्हाण तर श्वासच विसरून जाण्याची भाषा करत आहेत. 

ही टीका आवडणार नाही, रूचणार नाही

लातूरकरच काय महाराष्ट्रातील काेणत्याही सामान्य व्यक्तीला विलासराव देशमुख यांच्यावरची ही टीका आवडणार नाही, रूचणार नाही. कारण काही काही व्यक्तिमत्वच अशी असतात की ती लाेकांमध्ये इतकी मिसळून गेलेली असतात की त्यांना वेगळे करणे केवळ अशक्य असते. रविंद्र चव्हाण यांनी खरे तर असे वक्तव्य करून भाजपचा फायदा  नाही तर खूप माेठे नुकसान केले आहे. ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्याविराेधात बाेलायचे, काेकणात राणेंना डिवचायचे आणि मराठवाड्यात थेट विलासराव देशमुखांविषयी बाेलायचे, असे करण्याने पक्षाचा त्यांच्या हातून काही ायदा हाेईल असे वाटत नाही. लाेकमान्य टिळकांनी (Lokmanya Tilak) एका अग्रलेखाचे शिर्षक सरकारचे डाेके ठिकाणावर आहे का, असे दिले हाेते. आज दुर्दैवाने म्हणावे लागत आहे की भाजपच्या प्रदेशाध्यक्षांचे डाेके ठिकाणावर आहे का?



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या