कानडीने केला मराठा भ्रतार, एकाचे उत्तर एका न ये, असा एक संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे. कानडी महिलेने मराठी नवरा केला आणि मग त्यांच्यात कसा गाेंधळ उडाला, असा या अभंगाचा अर्थ आहे. म्हणजे पत्नी एक बाेलते आणि पती, त्याचा वेगळाच अर्थ लावताे आणि त्यांच्या संसाराचा गाेंधळात गाेंधळ सुरू हाेताे, याचे मार्मिक वर्णन तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगातून केले आहे. आता हा अभंग नेमका आठवण्याचे कारण म्हणजे नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये काही पालिकांमध्ये पुढील पाच वर्षे तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणेच परिस्थिती असणार आहे.BARSHI ;कानडीने केला मराठा भ्रतार, एकाचे उत्तर एका न ये, असा एक संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे. कानडी महिलेने मराठी नवरा केला आणि मग त्यांच्यात कसा गाेंधळ उडाला, असा या अभंगाचा अर्थ आहे. म्हणजे पत्नी एक बाेलते आणि पती, त्याचा वेगळाच अर्थ लावताे आणि त्यांच्या संसाराचा गाेंधळात गाेंधळ सुरू हाेताे, याचे मार्मिक वर्णन तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगातून केले आहे. आता हा अभंग नेमका आठवण्याचे कारण म्हणजे नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये काही पालिकांमध्ये पुढील पाच वर्षे तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणेच परिस्थिती असणार आहे. म्हणजे असे की राज्यातील जवळपास 10 नगरपालिकांमध्ये नगराध्यक्ष एका पक्षाचा आणि नगरसेवकांचे बहुमत मात्र त्यांच्या विराेधी पक्षाचे, अशी विचित्र स्थिती निर्माण झाली आहे. जनतेमधून थेट नगरसेवक निवडून देण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे अनेक पालिकांमध्ये अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. 2001 मध्ये विलासराव देशमुख मुख्यमंत्री हाेते. त्यांनी पहिल्यांदा थेट जनतेमधून नगराध्यक्ष निवडीचा निर्णय घेतला. म्हणजे नगरसेवकांची निवडणूक वार्ड किंवा प्रभागामधून हाेईल, तर नगराध्यक्ष मात्र थेट जनतेमधून निवडून येईल, असा ताे निर्णय हाेता.
याचा पहिला फटका त्यांनाच बसला They were the first to be hit by this.
त्यापूर्वी निवडून आलेल्या नगरसेवकांमधून नगराध्यक्ष निवडून दिला जात असे. जनतेमधून का नगराध्यक्ष निवडून द्यायचा, तर ताे एका वार्डापुरता विचार न करता, संपूर्ण शहराचा विचार करेल, कारण संपूर्ण शहरातील मतदारांनी त्याला निवडून दिल्याची भावना कायम त्याच्या मनात राहिल. शिवाय नगराध्यक्षपदासाठी माेठी ाेडााेडी, घाेडेबाजार हाेत असे, ताे थांबेल. नगरसेवकांची पळवापळवी, दहशत, गुंडागर्दी यालाही आपाेआपच आळा बसेल, असा त्यामागचा विचार हाेता. पण मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी हा निर्णय घेतला आणि याचा पहिला फटका त्यांनाच बसला. लातूर पालिका निवडणुकीत नगरसेवकांचे बहुमत तर काँग्रेस पक्षाला मिळाले, पण नगराध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे जनार्धन वाघमारे निवडून आले. त्यानंतर 2006 साली हा निर्णय िफरविण्यात आला आणि पुन्हा नगरसेवकांमधून नगराध्यक्ष निवडण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यानंतर 2014 ला युतीचे सरकार राज्यात आले. त्यांनी पुन्हा हा निर्णय िफरविला आणि जनतेमधून थेट नगराध्यक्ष निवडीचा निर्णय घेतला. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारने पुन्हा हा निर्णय िफरवत नगरसेवकांमधून नगराध्यक्ष निवडीचा पर्याय स्वीकारला. आता महायुती सरकारने पुन्हा जनतेमधून नगराध्यक्ष आणि सरपंच निवडून देण्याचा निर्णय घेतला, आणि त्यानुसारच नगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या.
जशी लातूर पालिकेची परिस्थिती झाली हाेती what happened with the Latur municipality
आता त्यावेळी जशी लातूर पालिकेची परिस्थिती झाली हाेती, म्हणजे नगराध्यक्ष एका पक्षाचा आणि सभागृहात बहुमत दुसèया पक्षाचे अशी स्थिती यावेळी 10 नगरपालिकांमध्ये झाली आहे. सांगलीतल्या आटपाडीत भाजपचा नगराध्यक्ष झाला आहे आणि बहुमत मात्र शिंदे शिवसेनेकडे गेले आहे. भाजपचे सात तर शिंदे सेनेचे 8 नगरसेवक निवडून आले आहेत. लातूरमधील उदगीर नगरपालिकेत नगराध्यक्ष भाजपचा निवडून आला आहे तर बहुमत मात्र अजितदादांच्या राष्ट्रवादीकडे गेले आहे. भाजपचे 13 नगरसेवक निवडून आले आहेत तर 20 नगरसेवक हे अजितदादांचे निवडून आले आहेत.
नगराध्यक्ष एका पक्षाचा आणि उपनगराध्यक्ष दुसऱ्या The mayor is from one party and the deputy mayor is from another.
त्याचा काय परिणाम हाेऊ शकताे, याचा विचार केला तर अगदी उपनगराध्यक्ष निवडीपासून पालिकेतील राड्याला सुरूवात हाेऊ शकते. उपनगराध्यक्ष हा नगरसेवकांमधून निवडून दिला जाताे. आता बहुमत ज्या पक्षाचे असेल, त्यांचाच उपनगराध्यक्ष हाेणार. म्हणजे नगराध्यक्ष एका पक्षाचा आणि उपनगराध्यक्ष दुसऱ्या पक्षाचा अशी स्थिती निर्माण हाेणार, स्थायी समिती असेल किंवा आणखी इतर समित्या असतील, या सर्व समित्या बहुमत असणाèया पक्षाकडे जातील. त्यामुळे नगराध्यक्षांना काेणताही निर्णय घ्यायचा असेल तर परिस्थिती अवघड, कठिण आणि संघर्षाची हाेऊन बसणार आहे. अहमदपूर नगरपालिकेतही भाजपचा नगराध्यक्ष निवडून आला असला तरी बहुमत मात्र अजितदादांच्या राष्ट्रवादीकडे गेले आहे. भाजचे अवघे तीन नगरसेवक निवडून आले आहेत तर अजितदादांचे 23 नगरसेवक निवडून आले आहेत. बीडच्या अंबाजाेगाईत आमदार नमिता मुंदडा यांचे सासरे नंदकिशाेर मुंदडा हे नगराध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत तर बहुमत मात्र राजकिशाेर माेदी यांच्याकडे गेले आहे. मुंदडा यांचे 11 तर माेदी यांचे 20 नगरसेवक निवडून आले आहेत. संभाजीनगरमधील कन्नड, धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा, परभणी जिल्ह्यातील साेनपेठ, आणि गंगाखेड याठिकाणीही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.
स्थानिक पातळीवरील राजकारण हे वेगळे असते, Local-level politics is different.
अर्थातच या सगळ्यांचा परिणाम पालिकेच्या कारभारावर हाेणार आहे. महायुती म्हणून एकत्र कारभार करायचा ठरले तर काही ठिकाणी हा प्रश्न सुटू शकताे. पण एक आहे, स्थानिक पातळीवरील राजकारण हे वेगळे असते, त्यामुळे राज्यात महायुती किंवा महाविकास आघाडी वगैरे काहीही असले तरी तसे स्थानिक पातळीवर घडणे कठिणच असते. त्यामुळे या पालिकांमध्ये संघर्ष अटळ आहे, हे नक्की.
0 टिप्पण्या