Follow Us

उमेदवारांची निवडणूक कार्यालयात झुंबड !

 


उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सकाळपासूनच सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी निवडणूक कार्यालयात मोठी गर्दी केली होती. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित जोडली आहेत का, कुठलीही त्रुटी राहणार नाही ना, याची काटेकोर काळजी उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते घेत होते. दुपारी बारा वाजल्यापासून नॉर्थकोर्ट प्रशाळेसह विविध निवडणूक कार्यालयांसमोर इच्छुक उमेदवार व कार्यकर्त्यांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.

सोलापूर : Solapur उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी ३० डिसेंबर रोजी भाजपकडून आपल्या उमेदवारांचे ए व बी फॉर्म शेवटच्या क्षणी विविध निवडणूक कार्यालयांत दाखल करण्यात आले. यावेळी वेळ संपल्यानंतर फॉर्म स्वीकारल्याचा आरोप करत विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक कार्यालयाबाहेर घोषणाबाजी करत भाजपच्या (BJP) नेत्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही काळ निवडणूक कार्यालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

कार्यकर्त्यांची मोठी धावपळ उडाली There was a lot of hustle and bustle among the workers

भाजपचे एबी फॉर्म वेळेत पोहोचवण्यासाठी आमदार सचिन कल्याणशेट्टी, शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांच्यासह अन्य प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी धावपळ उडाली. वेळेची मर्यादा संपल्यानंतर भाजपच्या नेत्यांना फॉर्म सादर करण्यास मुभा देण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला. या आरोपांनंतर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी निवडणूक कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. काही काळ भाजपच्या नेत्यांना कार्यालयात प्रवेश करण्यापासून अडवण्यात आले.

स्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिस (POLICE) प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप केला. पोलिस व शीघ्र कृती दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर सुरक्षेच्या बंदोबस्तात भाजपच्या नेत्यांना त्यांच्या उमेदवारांचे एबी फॉर्म सादर करण्यासाठी निवडणूक कार्यालयात प्रवेश देण्यात आला. या संपूर्ण प्रकारामुळे निवडणूक प्रक्रियेत मोठी धावपळ आणि गोंधळ उडाल्याचे चित्र दिसून आले.

सकाळपासूनच कार्यालयात मोठी गर्दी There has been a large crowd at the office since morning.

दरम्यान, उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सकाळपासूनच सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी निवडणूक कार्यालयात मोठी गर्दी केली होती. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित जोडली आहेत का, कुठलीही त्रुटी राहणार नाही ना, याची काटेकोर काळजी उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते घेत होते. दुपारी बारा वाजल्यापासून नॉर्थकोर्ट प्रशाळेसह विविध निवडणूक कार्यालयांसमोर इच्छुक उमेदवार व कार्यकर्त्यांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.

प्रशासनाकडून दुपारी तीन वाजेपर्यंत नॉर्थकोर्ट प्रशाळेच्या प्रवेशद्वारातून आत आलेल्या सर्व उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यात येतील, असे जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे शेवटच्या तासात अनेक उमेदवार, पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते वेळेच्या मर्यादेत अर्ज आणि एबी फॉर्म सादर करण्यासाठी धावपळ करताना दिसून आले.

उत्साहाचे आणि तणावाचे वातावरण An atmosphere of excitement and stress

उमेदवारी अर्ज भरून झाल्यानंतर विविध पक्षांचे प्रमुख उमेदवार आपल्या कार्यकर्त्यांसह विजयाची खूण दाखवत निवडणूक कार्यालयाबाहेर पडत होते. काही प्रभागांत संपूर्ण पॅनलमध्ये प्रतिस्पर्धी कमजोर असल्याचा अंदाज बांधत अनेक कार्यकर्ते खाजगीत आपल्या उमेदवारांचा विजय निश्चित असल्याचे सांगत होते. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेच्या शेवटच्या दिवशी उत्साहाचे आणि तणावाचे मिश्र वातावरण पाहायला मिळाले.

दरम्यान, भाजपकडून उमेदवारी अर्ज सादर करताना शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर(Rohini Tadawakar) यांनी दाखवलेली सक्रियता लक्षवेधी ठरली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपण्यास अवघे वीस मिनिटे शिल्लक असताना आमदार सचिन कल्याणशेट्टी, रोहिणी तडवळकर व अन्य पदाधिकारी एबी फॉर्म घेऊन नॉर्थकोर्ट प्रशाळेत दाखल झाले. वेळ कमी असल्याने सर्व निवडणूक कार्यालयात फॉर्म पोहोचवण्यासाठी मोठी धावपळ उडाली. इच्छुक उमेदवारांनीही त्यांना गराडा घातल्याने काही काळ धक्काबुक्की झाली.

यानंतर परिस्थिती सावरत रोहिणी तडवळकर यांनी तरुण कार्यकर्त्यांसह विविध कार्यालयांत धाव घेत एबी फॉर्म सादर करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांनी दाखवलेला उत्साह आणि सक्रिय सहभाग आगामी महापालिका निवडणुकीसाठी पक्षाच्या विजयाची तळमळ दर्शवणारा असल्याचे भाजप कार्यकर्त्यांमध्ये चर्चिले जात होते. संपूर्ण प्रक्रियेदरम्यान त्यांनी दाखवलेली भूमिका पक्ष संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची ठरल्याचेही बोलले जात होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या