बार्शीहून पुणे, आणि तिथून रेल्वेने अखंड दाेन दिवसांचा प्रवास. तब्बल 1700 किलाेमीटर. अनाेळखी प्रवासी, अनाेळखी स्टेशन, आणि मनात फक्त एकच विचारड्ढस्क्रीनवर दिसणाèया त्या व्यक्तीला भेटायचं. हा प्रवास एखाद्या सिनेमासारखा वाटावा असा, पण प्रत्यक्षात ताे अत्यंत धाेकादायक, कुठल्याही क्षणी जीवावर बेतू शकणारा हाेता.
बार्शी ; Barshi
साेशल मीडियावरची एक साधी ओळख कधी जीवघेण्या प्रवासात बदलते, हे कळायलाही वेळ मिळत नाही. हातात स्मार्टाेन, डाेळ्यांसमाेर रंगीबेरंगी रील्स आणि मनात विश्वासड्ढपण या विश्वासालाच फसवणुकीची धार असू शकते, याचा धक्का देणाèया घटना गेल्या महिनाभरात सातत्याने समाेर येत आहेत. इंस्टाग्रामवरून जुळलेल्या मैत्रीपायी राज्यातील अनेक अल्पवयीन मुली घर साेडून थेट मुंबई, गुजरात, आसामसारख्या दूरच्या भागांपर्यंत पाेहाेचल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत.(The trap of friendship on Instagram; girls wander around in search of a boyfriend.)
नागपूर, यवतमाळ, मुंबई (mumbai) याठिकाणी या महिन्यात काही अशाच घटना घडल्या आणि हे सगळे आता केवळ मेट्राे सिटी पुरतेच राहिलेले नाही तर त्याचे लाेन आता बार्शी सारख्या ग्रामीण भागापर्यंतही पाेहाेचले आहे, ही चिंतेची बाब आहे.
सुरुवातीला साधे मेसेज, मग राेजची चॅट Initially, simple messages, then daily chats.
बार्शीची (Barshi) किशाेरवयीन मुलगी. वय अनुभव शिकण्याचं, स्वप्नांना दिशा देण्याचं. पण तिच्या आयुष्यात दिशा दिली ती साेशल मीडियावर झालेल्या एका ओळखीने. एका प्लॅटफफाॅर्मवर तिची ओळख झाली डेहराडून येथील एका अल्पवयीन मुलाशी. सुरुवातीला साधे मेसेज, मग राेजची चॅट, त्यानंतर ाेन काॅल्स आणि व्हिडीओ काॅल्स. अंतर हजाराे किलाेमीटरचं हाेतं, पण स्क्रीनमुळे ते जाणवत नव्हतं. हळूहळू दाेघेही भावनिक गुंत्यात अडकले आणि आभासी जगच खरं असल्याचा भास निर्माण झाला.
प्रेमाच्या आणाभाका घेतल्या गेल्या. प्रत्यक्ष भेटायचं ठरलं. आधी मुलाने महाराष्ट्रात येण्याचा विचार केला, पण ताे बेत रद्द झाला. आणि मग, क्षणिक धाडसाने की अपरिपक्व भावनेनेड्ढती मुलगीच घर साेडण्याच्या निर्णयापर्यंत पाेहाेचली. काेणालाही संशय येऊ न देता, थाेडे कपडे, थाेडे पैसे घेतले आणि ती निघाली.
![]() |
| बार्शीहून पुणे, आणि तिथून रेल्वेने अखंड दाेन दिवसांचा प्रवास. |
प्रत्यक्षात ताे अत्यंत धाेकादायक In reality, he is extremely dangerous.
बार्शीहून पुणे, आणि तिथून रेल्वेने अखंड दाेन दिवसांचा प्रवास. तब्बल 1700 किलाेमीटर. अनाेळखी प्रवासी, अनाेळखी स्टेशन, आणि मनात फक्त एकच विचारड्ढस्क्रीनवर दिसणाèया त्या व्यक्तीला भेटायचं. हा प्रवास एखाद्या सिनेमासारखा वाटावा असा, पण प्रत्यक्षात ताे अत्यंत धाेकादायक, कुठल्याही क्षणी जीवावर बेतू शकणारा हाेता.
इकडे घरात मुलगी दिसेनाशी झाल्यावर पालकांच्या पायाखालची जमीन सरकली. शाेधाशाेध, भीती, आणि अखेर पाेलिसांत धाव. प्रकरण अल्पवयीन मुलीच्या सुरक्षेचं असल्याने पाेलिसांनी क्षणाचाही विलंब केला नाही. सायबर सेलच्या मदतीने माेबाईल लाेकेशन ट्रॅक करण्यात आलं आणि धक्कादायक सत्य समाेर आलंड्ढमुलगी थेट डेहराडूनकडे पाेहाेचली हाेती.
तत्काळ उत्तराखंड (uttarakhand) पाेलिसांशी संपर्क साधण्यात आला. वेळेवर हालचाल झाली. आणि त्या आभासी प्रेमाची प्रत्यक्ष भेट हाेण्याआधीच, डेहराडून रेल्वे स्टेशनवर स्थानिक पाेलिसांनी तिला ताब्यात घेतलं. काेणताही अनर्थ घडण्याआधी, काेणताही धाेका ओढवण्याआधीड्ढती सुरक्षितपणे महाराष्ट्रात परतली आणि पालकांच्या स्वाधीन करण्यात आली.(The trap of friendship on Instagram; girls wander around in search of a boyfriend.)
प्रेमात पडली आणि त्याला शाेधत ती आली. She fell in love and came searching for him
आता दुसरी अशीच एक अल्पवयीन मुलगी आसाममधून यवतमाळमध्ये आली. इंस्टावरील ओळखीतून ती यवतमाळच्या तरुणाच्या प्रेमात पडली आणि त्याला शाेधत ती आली. जेव्हा ती त्या तरूणाच्या घरी पाेहाेचली तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसला. त्या तरूणाच्या कुटुंबातील लाेकांनी तिला बालकल्याण समितीच्या स्वाधीन केले. त्यांनी तिचे समुपदेशन केले आणि तिच्या कुटुंबातील व्यक्तींना बाेलावून त्यांच्याकडे सुपुर्द केले. नागपूरहून अशीच एक तरूणी आपल्या प्रेमाच्या शाेधात यवतमाळला आली तर दुसरी आणखी एक मुलगी थेट गुजरातमधून प्रियकराचा शाेध घेत यवतमाळमध्ये आली हाेती. या तिनही घटना डिसेंबर महिन्यातील आहेत.
पाेलिसांनी पालकांना आणि विद्यार्थ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. मुलांच्या ऑनलाइन हालचालींवर लक्ष ठेवणे, त्यांच्याशी माेकळा संवाद ठेवणे आणि काेणतीही संशयास्पद बाब आढळल्यास तात्काळ पाेलिसांशी संपर्क साधणे, हेच अशा घटनांना आळा घालण्याचे प्रभावी उपाय असल्याचे पाेलिसांचे म्हणणे आहे. वेळेवर सावधगिरी बाळगली, तर आभासी मैत्रीचा सापळा वास्तवातील संकट बनण्यापासून नक्कीच राेखता येऊ शकताे.
.png)

0 टिप्पण्या