ब्रेकिंग :

विठ्ठल रुक्मिणी मंदिरात संताप आणणारा प्रकार, चिकन मसाला वाटप













पंढरपूर : दीपावली सण हा उत्साहाचा, आनंदाचा आहे. हिंदू सणातील हा महत्त्वाचा सण आहे. या सणानिमित्त

अनेकजण एकमेकांना भेटवस्तू देतात. मात्र पंढरपुरात सुरक्षा रक्षकाचा ठेका घेतलेल्या बीव्हीजी कंपनीने

दीपावली सणानिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांना चिकन मसाला भेट दिला आहे. या

प्रकरणी समितीने बीव्हीजीला नोटीस बजावली आहे.

विठ्ठल-रुक्मिणी हे महाराष्ट्रा चे आराध्य दैवत आहेत. देवाच्या दर्शनाला राज्यभरातून लोक येतात. यात्रा

कालावधीत येणाऱ्या लाखो भाविकांच्या भावना दुखावू नयेत, यासाठी शासनाकडून यात्रा काळात शहरातील

मांस विक्रीची दुकाने बंद करण्यात येतात. तसेच विठ्ठल मंदिरात काम करणारे देखील कर्मचारी मोठ्या

सेवाभावी वृत्तीने काम करतात. मात्र मंदिर समिती सुरक्षा रक्षकाचा ठेका घेतल्यापासून वादात असलेल्या

बीव्हीजी कंपनीकडून सतत विठ्ठल भक्तांच्या भावना दुखाविण्याचे काम होत आहे. भाविकांना शिवीगाळ,

मारहाण, त्याचबरोबर तीर्थ म्हणून चंद्रभागा नदीच्या पाण्याची विक्री असे प्रकार बीव्हीजी कंपनीच्या

कर्मचाऱ्यांकडून घडले आहे.


Post a Comment

Previous Post Next Post